Adolf Hitler – Marathi
₹100.00
Description
Price: ₹ 100.00
(as of Dec 02,2020 19:34:33 UTC – Details)
From the Publisher
Adolf Hitler by Raghuveersingh Rajput
अॅडॉल्फ हिटलर! इतिहासातील एक कलंकित व्यक्तिमत्त्व. कोणीही चांगल्या भावनेने हे नाव उच्चारत नाही. ज्यांना पूर्ण इतिहास माहीत नाही, त्यांच्या मनातही या नावाबद्दल घृणाच ओतप्रोत भरून राहिलेली का? कारण संबंध काहीच नाही.
त्याची संपूर्ण योजना झाली असती तरी जगाने त्याच्या त्रुटी शोधत न बसता त्याला ‘जगज्जेता’ म्हणून डोक्यावर घेऊन मिरवले असते. इतिहासाने त्याच्या शौर्याच्या रसभरीत वर्णनाने पानेच्या पाने रंगवली असती.
जगात नेहमी जेत्याच्या उदोउदो होतो. पराजिताला कोणाचीच सहानुभूती मिळत नाही. उलट सगळीकडून खूप अवहेलना सहन करावी लागते. असे काही भोगावे लागू नये म्हणून शेवटी हिटलरने स्वत:च आत्महत्या करून स्वत:ची सुटका करून घेतली.
अॅडॉल्फ हिटलर! जर्मनीचे एका विशाल, समृद्ध आणि स्वाभिमानी साम्राज्यात रूपांतर व्हावे ही महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक आक्रमक नेता; परंतु याच महत्त्वाकांक्षेने त्याच्यावर स्वार होऊन त्याला एक विकृत, सत्तापिपासू राजकारणी बनवले; मग विसाव्या शतकावर खुणा राहिल्या त्या कोट्यवधी बळींच्या यातनांच्या, दुसर्या महायुद्धाच्या आणि भयाच्या सावल्यांच्या. सत्तालालसा नराचा नराधम कसा बनवते याचे चित्रण करणारी हिटलरची ही गोष्ट वाचायलाच हवी.
Reviews
There are no reviews yet.