Savitribai Phule

120.00

Description

Price: ₹ 120.00
(as of Dec 07,2020 09:25:12 UTC – Details)

jPjiA4C

इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते. जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे. जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे. जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे|From the Publisher

Savitribai Phule by G. A. Ugale

Savitribai PhuleSavitribai Phule

आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसतात. त्यांना ‘सावित्रीच्या लेकी’ असे म्हटले जाते. कारण सावित्रीबाईंनी सर्व स्त्रियांना प्रगतीची, यशाची वाट दाखविली. सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी देदीप्यमान यश संपादन केले. याची मूळ प्रेरणा सावित्रीबाई फुले या होत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक, समता चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या, वेळप्रसंगी कच न खाता प्रबोधन चळवळीला गतिमान करणार्‍या आद्य भारतीय प्रशिक्षित अध्यापिका आणि भारतातील पहिल्या यशस्वी मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळाला. अध्यापन कार्याबरोबरच त्यांनी तळागाळातील समाजासाठीही आपले जीवन कारणी लावले. एका हातात शिक्षण आणि दुसर्‍या हातात समाजसुधारकाची वृत्ती त्यांच्या अंगी होती. बालहत्या प्रतिबंधासाठी पुढाकार, हुंड्याविना कमी खर्चात विवाह लावून देणे, दुष्काळात सापडलेल्या जनसामान्यांची सेवा, निराधारांना आधार अशा प्रकारे चंदनासमान झिजणार्‍या सावित्रीबाई एक उत्तम शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री, लेखिका तर होत्याच; पण त्या उत्तम वक्त्याही होत्या. उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने आणि कर्ज आदी विषयावर भाषणे करून त्यांनी समाजमनाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाच्या माध्यमातून मानवमुक्तीची वाट दाखविणार्‍या त्यांच्या विचाराची ओळख होते आणि त्यांची वैचारिक भूमिका समजून घेऊन मानवता केंद्र गाठण्यास फार मोठी मदत होते.

इतिहास घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या बहुजन समाजाला इतिहासलेखनाचे मात्र भान नसावे, हे शल्य सर्वश्रुत सात शल्यांपेक्षाही अधिक जिव्हारी बोचणारे आहे. ते भान थोडे जरी असते, तरी सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या क्रांतिकारी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचे दाहक, विदारक तपशील असे कायमचे भूतकाळात गाडले गेले नसते. जोतीरावांचे मूलगामी चिंतन, दूरदर्शी विचार आणि देशी प्रतिभा थोडीफार तरी वाचकांपर्यंत पोहोचली, सावित्रीबाईंचे लेखन मात्र बव्हंशी कालगतच झालेले दिसते. तसा तर त्या उभयतांबाबत आजही ज्ञातापेक्षा अज्ञाताचाच प्रांत प्रचंड मोठा आहे. जोतीरावांच्याही आधी ज्यांच्या कवनांना प्रसिद्धीचा प्रकाश दिसला त्या सावित्रीबाईंच्या साहित्यिक आणि सामाजिक कर्तृत्वाची साक्ष देणारी । फारच थोडी साधने आज हाताशी आहेत. त्यांचीच फिरवाफिरव करून उणीपुरी साठ छोटी-मोठी पुस्तके सावित्रीबाई फुल्यांवर प्रकाशित झाली असली तरी त्रुटी होती तशीच कायम आहे. जी. ए. उगले यांचे प्रस्तुत छोटेखानी पुस्तक प्रयत्नांची योग्य दिशा दाखवणारे आहे. लेखक फुले परंपरेचा आस्थेवाईक; पण अभ्यासपूर्ण शोध घेऊ पाहत असल्यामुळे त्यांच्या लेखनात अभिनिवेश, भावविवशता किंवा अतिशयोक्ती नाही. आधार नसेल तिथे तो नाही हे सांगण्याची सचोटी आहे. नवी माहिती मिळवून वाचकांसमोर ठेवण्याची डोळस धडपडही आहे. उपलब्ध झालेले सर्व तपशील तपासून त्यात नवे गवसलेले जोडून उगले यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आणि काव्यावर येथे प्रकाश टाकला आहे.

– भास्कर लक्ष्मण भोळे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Savitribai Phule”

Your email address will not be published. Required fields are marked *